शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सोन्याची नकली नाणी देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:29 AM

Crime News : दोन देशी कट्ट्यांसह, शस्त्रात्र आणि नकली सोन्याची नाणीही जप्त केली.

ठळक मुद्दे खामगाव पोलिसांची धडक कारवाई२६ आरोपी, दोन देशी कट्ट्यांसह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खोदकामात सापडलेले सोने कमी किंमतीत देण्याचे आमीष देऊन गंडविणाºया  २६ जणांच्या एका टोळीला खामगाव विभागीय पोलिसांनी गुरूवारी कोंबींग आॅपरेशन राबवून अटक केली. यावेळी राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत दोन देशी कट्ट्यांसह रोख २६ लाख ४४५० रुपये आणि शस्त्रासह ३१ लक्ष ७९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची नकली नाणी देऊन गंडविणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती उपविभागीय पोलिस पथकाला मिळाली. या संघटीत टोळीद्वारे राज्यातील अनेकांना गंडविण्यात आले. कमी किंमतीत  सोन्याची नाणी देण्याचा सौदा ठरवायचा. सौदा ठरल्यानंतर संबंधितांना अंत्रज शिवारात बोलवायचे ग्राहकाकडील रक्कम आणि ऐवज लुटायचा अशी प्रॅक्टीस असलेल्या टोळीने ५ मे रोजी औरंगाबाद येथील एका व्यापाºयाची फसवणूक केली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३६५, ३९७, ४२०, १२० अन्वये दाखल गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरावे आणि माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी खामगाव उपविभागीय पोलिस अधिकार क्षेत्रातील पोलीस निरिक्षक, सहा. निरिक्षक, पोलीस नायक आणि पोलिसांच्या मदतीने गुरूवारी पहाटे चिखली रोडवरील अंत्रज येथे कोंबींग आॅपरेशन राबविले. या धडक कारवाईत टोळीतील २५ संशयीतांना अटक करण्यात आली. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन देशी कट्टे, मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकराच्या अनेक गुन्ह्याचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कारवाईत शहर पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, शिवाजी नगरचे निरिक्षक सुनिल हुड, शेगाव शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख, सपोनी गोकुळ सूर्यवंशी, पोउपनि गौरव सराग, सूवर्णा गोसावी, यांच्यासह पोलिस पथक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी गुरूवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेला कारवाईत सहभागी झालेले अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते.

 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल!- पिवळ्या धातूच्या नकली गिन्नी १७ किलो ६५० ग्रॅम(किं १८ हजार )- पांढºया धातुचे दागदागीणे ०२ किलो ५०० ग्रॅम(१ लाख)- सोन्याचे दागिणे ५६ ग्रॅम(३ लाख)-  देशी पिस्तुल(०६ एमएम) दोन नग(५९ हजार)-  लोखंडी तलवार दोन नग (२ हजार)-  लहान मोठे लोखंडी सुरे १० नग (३ हजार)- टोकदार लोखंडी भाले ०५ नग(२ हजार)- लाकडी फरशी कुºहाड एक नग (४०० रुपये)- सबमर्शीबल पंप एक नग(२१ हजार)- मोबाईल २६ नग(७० हजार)

 दीडशे पोलिसांनी फत्ते केले आॅपरेशन- खामगाव तालुक्यातील सांघिक गुन्हे करणाºया टोळीचे कोंबीग आॅपरेशन राबविण्यासाठी १५० पोलिस आणि १५ अधिकाºयांनी प्रयत्न केले. जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.

 खामगाव विभागीय पोलीस पथकाकडून संघटीत गुन्हेगाºयांच्या टोळीचा बिमोड करण्यासाठी गुरूवारी धाडसी प्रयत्न करण्यात आले. जिकरीची अशी मोहिम पोलिसांनी सांघिक प्रयत्नांतून यशस्वी केली. कारवाईत सहभागी असलेले सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी प्रंशसेस पात्र आहेत.

- अरविंद चावरीयाजिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी