एटीएमचा पिन विचारून फसवणूक
By Admin | Updated: May 11, 2015 02:07 IST2015-05-11T02:07:51+5:302015-05-11T02:07:51+5:30
संग्रामपूर येथील घटना.

एटीएमचा पिन विचारून फसवणूक
संग्रामपूर : बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम क्रमांक व पीन विचारुन खात्यातून २३ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना १0 मे रोजी घडली. अकोली बु.येथील उमेश पंजाबराव चोपडे यांना १0 मे रोजी ९६३१३७७१७४ या क्रमांकावरून भ्रमणध्वनी आला व महाराष्ट्र बँकेच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून उमेश चोपडे यांना एटीएम क्रमांक व पीन विचारला. चोपडे यांनीही त्यांचा एटीएम क्रमांक व पीन क्रमांक सांगितला. त्यानंतर थोड्या वेळातच उमेशच्या खात्यातून २३ हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश उमेशच्या भ्रमणध्वनीवर आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. उमेशच्या खात्यातील रक्कम हैद्राबाद येथील एटीएममधून काढण्यात आली आहे.