शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:27 IST

बुलडाणा: अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिची छेडखानी करणाºयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ मे रोजी ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिची छेडखानी करणाºयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ मे रोजी ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.आरोपी रमेश वाघ हा पिडीतीच्या घरासमोरुन चकरा मारायचा. तिला नेहमी खाणाखुना करायचा. दुचाकीवरुन तिचा पाठलाग करायचा. दरम्यान, २४ आॅगस्ट २०१७ रोजी आरोपीने पिडीतेला बळजबरीने दुचाकीवरुन मलकापूर येथे नेले. तेथे उमेश इंगळे व माधुरी इंगळे यांच्या मदतीने इंदूरला जाऊ, असे सांगितले; मात्र शहर पोलीस शोधात असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्यामुळे त्याने पिडीतेला बुलडाणा येथे आणून सोडले.पिडीतेने सर्व घटना आई वडिलांना सांगितली. त्यामुळे त्यांनी रमेश अशोक वाघ, उमेश ताराचंद इंगळे व माधुरी उमेश इंगळे यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाने आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीता, तिची आई व मामा यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. वसंत भटकर यांनी आरोपीविरुध्द प्रबळ युक्तिवाद केला. सर्व पुरावे व साक्ष विशेष न्यायालयासमोर मांडून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीशांनी आरोपी उमेश वाघ यास ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम १२ नुसार १ वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर उमेश इंगळे व माधुरी इंगळे यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव कवास यांनी केला. कोर्ट पैरवी किशोर कांबळे यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय