चार चाकी गाडी लंपास
By Admin | Updated: December 8, 2014 01:27 IST2014-12-08T01:27:39+5:302014-12-08T01:27:39+5:30
अमडापूर येथील घटना; अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

चार चाकी गाडी लंपास
अमडापूर (बुलडाणा) : स्थानीक बसस्टँड परिसरातील एका शेतकर्याची घरासमोरील क्रुझर गाडी अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना ६ डिसेंबर २0१४ च्या रात्री दरम्यान घडली आहे.
याबाबत त्र्यंबक महादेव गायकवाड रा.अमडापूर यांनी अमडापूर पो.स्टे.ला ७ डिसेंबर रोजी तक्रार दिली की, माझे मालकीचे घर जगदंबा पतसंस्थेच्या मागे असून ६ डिसेंबर २0१४ रोजी माझ्या मालकीची फोर्स क्रुझर गाडी क्रं.एम.एच.२८ व्ही. 0७0९ ही सिल्वर कलर घरासमोर उभी होती. सदर गाडी ७ डिसेंबर २0१४ रोजी सकाळी ६ वाजेला घरातुन बाहेर येवून पाहिले असता माझी क्रुझर गाडी किंमत ४ लाख रुपयाची कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे, अशी तक्रार अमडापूर पो.स्टे.ला त्र्यंबक महादेव गायकवाड वय ७५ वर्षे रा. अमडापूर यांनी दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास प.एस.आय.रविंद्र जाधव हे करीत आहे.