शेगावात चार हजार लिटर रॉकेल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 14:19 IST2018-10-01T14:18:56+5:302018-10-01T14:19:23+5:30
शेगाव : शहरात दोन ठिकाणाहून २०० लिटरचे १९ बॅरल रॉकेल रविवारी मध्यरात्री नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकुन जप्त केले.

शेगावात चार हजार लिटर रॉकेल जप्त
लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव : शहरात दोन ठिकाणाहून २०० लिटरचे १९ बॅरल रॉकेल रविवारी मध्यरात्री नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकुन जप्त केले. गोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील धानुका कंपाउंड परिसरात गोपाल अग्रवाल यांच्या घरानजिक रॉकेलच्या २०० लिटर च्या १६ बॅरल (टाक्या) तसेच हाऊसिंग सोसायटी परिसरात मोकळ्या जागेत ठेवलेले रॉकेलचे ३ बॅरल जप्त केले. दोन्ही ठिकाणी पंचासमक्ष पंचनामा करून शहर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिल्यात. त्याचप्रमाणे तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना सुध्दा पोलीसांनी माहिती दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आव्हाड एएसआय राठोड, पोहेकॉ महेर, पो.काँ. शिंदे, महिला पो.कॉ. वाकोडे चालक बोर्डे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)