बुलडाणा तालुक्यात चार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:54+5:302021-07-05T04:21:54+5:30

बीजप्रक्रिया मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद बुलडाणा : बीजप्रक्रिया मोहीम यशस्वी केल्याबद्दल संचालकांकडून शेतकरी व कृषी सहाय्यकांचे कौतुक करण्यात आले आहे. ...

Four positives in Buldana taluka | बुलडाणा तालुक्यात चार पॉझिटिव्ह

बुलडाणा तालुक्यात चार पॉझिटिव्ह

बीजप्रक्रिया मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

बुलडाणा : बीजप्रक्रिया मोहीम यशस्वी केल्याबद्दल संचालकांकडून शेतकरी व कृषी सहाय्यकांचे कौतुक करण्यात आले आहे. बुलडाणा उपविभागामध्ये बीजप्रक्रियेची २ हजार ४११ प्रात्यक्षिके राबविली असून, त्यामध्ये १७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

पावसामुळे लांबली रस्ता कामे

मोताळा : मे महिन्यामध्ये तालुक्यातील अनेक भागात रस्ता दुरुस्तीची कामे सुरू होती. परंतु पावसाळ्यामुळे रस्त्यांची कामे लांबवण्यात आली. आता पावसाने उघडीप दिली असली तरी रस्त्याची कामे बंदच आहेत.

वीजपुरवठा खंडित

बुलडाणा : शहरानजीक असलेल्या सागवन परिसरात शनिवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारी उशिरापर्यंत विद्युतपुरवठा बंद होता. शहरातही काही भागात वीज खंडित झाल्याचे दिसून आले.

निधी वितरणात अडचणी

बुलडाणा : पंधराव्या वित्त आयाेगातील निधी वितरणासाठी काही ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. कोरोनामुळे अनेक ग्रामपंचायतींना गावातील विकासकामांसाठी यापूर्वीही निधी मिळालेला नाही. त्यात आता तांत्रिक अडचणींमुळे निधी वितरणास खोड निर्माण होत आहे.

Web Title: Four positives in Buldana taluka