शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात चार टक्के पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:31 IST

बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का तब्बल १२ दिवसांनी एक टक्का वाढला असून आतापर्यंत चार टक्के शेतकºयांना ६६ काटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का तब्बल १२ दिवसांनी एक टक्का वाढला असून आतापर्यंत चार टक्के शेतकºयांना ६६ काटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २५ मे रोजी चार हजार १८२ शेतकºयांना ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील आठ हजार ७४७ शेतकºयांना ६६ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले असून त्याची टक्केवारी ही चार टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यात यंदा तीन लाख ३४ हजार शेतकºयांना एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. पीक कर्ज वाटपास प्रारंभ होऊन दीड महिन्याचा कालावदी जवळपास लोटला आहे. मात्र वाटपाचा टक्का अपेक्षेप्रमाणे सुधारलेला नाही. दर १५ दिवसांनी पीक कर्ज वाटपाचा आढावा यंत्रणा घेत आहे. त्यातून उपलब्ध झालेल्या  आकडेवारीचा विचार करता पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने कमी आहे. गत वर्षी ३४.१५ टक्के पीक कर्ज वाटप संपूर्ण हंगामात झाले होते. ही बाब पाहता यंदा हा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली करण्यात येत आहे. त्यासाठी पीक कर्ज मेळावे मंडळ निहाय घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र अपेक्षीत असा प्रतिसाद अद्याप त्यास मिळालेला नाही.मान्सून सध्या तोंडावर आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यात अद्याप एकदाही मान्सूनपूर्व पाऊस पडलेला नाही. येत्या काळात तो सक्रीय होईल. त्यामुळे शेतकºयांनीही शेती मशागतीची लगबक करून ती पूर्णत्वास नेली आहे. पावसाचे आगमन होताच शेतकरी पेरते होतील. मात्र त्यासाठी बी-बियाणे खरेदीसाठी वर्तमान स्थितीत शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध झाल्यास त्यांचा पुढील काळाताली भार हलका होण्यास मदत होणार आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने अत्यंत कमी आहे.दुष्काळी स्थिती पाहता शेतकºयांच्या हातात आता किमान पैसा असणे येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक झाले आहे. मात्र बँकांच्यास्तरावर त्यादृष्टीने अपेक्षीत कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेचे ३७ टक्के वाटपपीक कर्ज वाटपाचा विचार करता जिल्हा  केंद्रीय सहकारी बँकेने आतापर्यंत एकूण उदिष्टाच्या ३७ टक्के वाटप केले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट असून त्यापैकी १७ कोटी ४४ लाख रुपयांचे त्यांनी एक हजार ७४४ शेतकºयांना वाटप केले आहे. राष्टीयकृत, व्यापारी आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा विचार करता सर्वाधिक पीक कर्ज हे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने आतापर्यंत वाटप केले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी