भरधाव ट्रक कारच्या अपघातात चार जण गंभीर
By Admin | Updated: April 23, 2017 13:43 IST2017-04-23T13:43:57+5:302017-04-23T13:43:57+5:30
भरधाव जाणाºया ट्रकने समोरून येणाºया कारला जबर धडक दिली.

भरधाव ट्रक कारच्या अपघातात चार जण गंभीर
चिखली : भरधाव जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जबर धडक दिली. या
अपघातात कार मधील चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २२ एप्रिल
रोजी दुपारी साडे पाच वाजेच्या सुमारास देऊळगावराजा रोडवरील मलगी
फाटयाजवळ घडली. देऊळगावराजाकडून एम एच ४०/ एन/ ७५९२ या क्रमांकाचा ट्रक येत होता. मलगी
फाटयाजवळ येताच सदर ट्रकने समोरून येणाऱ्या एम एच ०८/ झेड/ ९५४३ या
क्रमांकाच्या कारला धडक दिली. या अपघातात कार मधील भिकू किसन तायडे ५८ रा
. रत्नागिरी, संदेश रामचंद्र कदम ३५,सौ प्रियदर्शनी संदेश कदम ३२,व नियती
संदेश कदम ही सात वर्षांची चिमुकली सुद्धा जखमी झाली आहे. जखमींना रोडने
जाणाऱ्या प्रवाशांनी त्वरित उपचारासाठी चिखली ग्रामीण रुग्णालयात दाखल
केले. मात्र प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे
हलवण्यात आले. या अपघातामधील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील
तपास ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महाजन करीत
आहे.