साडेचार लाखाने फसवणूक
By Admin | Updated: February 27, 2015 01:12 IST2015-02-27T01:12:29+5:302015-02-27T01:12:29+5:30
खामगावातील घटना.

साडेचार लाखाने फसवणूक
खामगाव (जि. बुलडाणा): येथील सरकी ढेपचे व्यापार्याची गुजरातमधील एका व्यापार्याने साडेचार लाखाची सरकी ढेप घेऊन पैसे न देता फसवणूक केली. याप्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील टिकमदास नारायणदास गांधी रा. सावजी ले-आऊट यांचे एमआयडीसीतील प्लॉट नं. ८0/८१ मध्ये मनसुख इंडस्ट्रीज नामक सरकी-ढेपचा कारखाना आहे. मागील १ सप्टेंबर २0१४ ते ६ ऑक्टोबर २0१४ दरम्यान गुजरात राज्यातील रहिवाशी तथा बाप्पा सीताराम एंटरप्राईजेसचे मालक नवीनभाई यांनी गांधी यांच्या मुलाला फोनद्वारे संपर्क करुन त्यांच्याकडून ३५९ क्विंटल सरकी-ढेप किंमत ७ लाख ३६ हजार रुपयांचा माल खोटी व चुकीची बतावणी करून मागून घेतला व त्यातील फक्त २ लाख ९४ हजार रुपये देऊन उर्वरित ४ लाख ४२ हजार रुपये देण्यास टाळाटाळ करुन फसवणूक केली. याप्रकरणी टिकमदास गांधी यांनी बाप्पा सीताराम एन्टरप्राईजेसचे मालक नवीनभाई रा.अमिरजरा कॉम्प्लेक्स पारिया रोड जे. के. स्टीलजवळ उडवाडा वापी (गुजरात) यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी कलम ४२0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.