चार लाखांची चोरी
By Admin | Updated: December 20, 2014 00:19 IST2014-12-20T00:19:29+5:302014-12-20T00:19:29+5:30
बुलडाणा येथे चोरट्यांनी चार लाख रूपये पळविले.

चार लाखांची चोरी
बुलडाणा : शहरातील एका कॅटर्स व्यावसायिकाचे घर फोडून अज्ञात चोरट्याने नगदी चार लाख व एक मोबाइल लंपास केला आहे. ही घटना १८ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विदर्भ हाऊसिंगमध्ये घडली.
शहरातील विदर्भ हाऊसिंग येथील रहिवासी भीमसिंग मनोहरसिंग सोळंकी यांचा कॅटर्सचा व्यवसाय आहे. गेल्या १७ डिसेंबर रोजी ते व्यवसायानिमित्त मेहकरला गेले होते. तिसर्या दिवशी घरी येताच त्यांना घराचे लॉक तुटलेले व घरातील कपाट उघडे दिसले. यावेळी अज्ञात चोरट्याने कपाटाचे लॉक तोडून त्यातील नगदी ४ लाख ५७१ रुपये व ३ हजार ७९0 रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, आज सकाळी त्यांनी शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दा खल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.