अश्लील सीडीसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:51 IST2017-09-21T00:48:46+5:302017-09-21T00:51:08+5:30

खामगाव : शहरातील गांधी चौक भागातील एका सीडी  विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे विभाग बुलडाणा पथकाने छापा  मारून अश्लील चित्रपटाच्या सीडींसह चार लाखांचा मुद्देमाल  जप्त केला.

Four lakhs seized with porn CD | अश्लील सीडीसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

अश्लील सीडीसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देगांधी चौकातील सीडी विक्रेत्यावर छापाथानिक गुन्हे विभागाच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील गांधी चौक भागातील एका सीडी  विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे विभाग बुलडाणा पथकाने छापा  मारून अश्लील चित्रपटाच्या सीडींसह चार लाखांचा मुद्देमाल  जप्त केला.
शहरातील गांधी चौक भागात अश्लील चित्रपटाच्या व  बनावट सीडींची विक्री होत असल्याची माहिती बुलडाणा ये थील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरून स् थानिक गुन्हे शाखेचे पीआय मनोज केदारे व पथकाने  मंगळवारी रात्री गांधी चौकात छापा मारून अशोक  कन्हय्यालाल कपूर (वय ६५) रा. सुटाळपुरा यास अश्लील  चित्रपटांच्या सीडींची विक्री करताना ताब्यात घेतले. यावेळी  पोलिसांनी त्याच्या सुटाळपुरा येथील राहत्या घराची झडती घे तली असता, त्या ठिकाणी अश्लील चित्रपटांच्या सीडी,  बनावट सीडी आणि एक संगणकासह एकूण चार लाख सात  हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर माल जप्त करून  याप्रकरणी पीआय केदारे यांच्या तक्रारीवरून अशोक कपूर  विरुद्ध कलम ५१, ५२ अ, ६३, ६४, ६८ अ सहकलम कॉ पीरॉईट अँक्ट सहकलम २९२ सहकलम ४ स्त्रियांचे असभ्य  प्रतिरूपन अधिनियम १९४८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Four lakhs seized with porn CD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.