चार लाखांचा गहू, तांदूळ जप्त

By Admin | Updated: September 4, 2015 00:33 IST2015-09-04T00:33:40+5:302015-09-04T00:33:40+5:30

धान्याची किंमत ४ लाख ३३ हजार रुपये.

Four lakh wheat and rice were seized | चार लाखांचा गहू, तांदूळ जप्त

चार लाखांचा गहू, तांदूळ जप्त

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील पिंपळखुंटा येथील स्वस्त धान्य दुकानातील शासकीय वितरण प्रणालीतील १९ हजार ७00 किलो गहू आणि तांदूळ काळाबाजारात जात असताना बुलडाणा पोलिसांनी पकडला. या धान्याची किंमत ४ लाख ३३ हजार रुपये एवढी असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मोताळा तालुक्यातील पिंपळखुटा येथे शासकीय वितरण प्रणालीतील गहू आणि तांदूळ काळाबाजारात जादा भावाने विकला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक बावस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, एएसआय प्रकाश राठोड यांनी सापळा रचून पिंपळखुटा येथील पांडुरंग भीमराव लांडे यांच्या बैलाच्या गोठय़ात छापा मारला. यावेळी पांडुरंग भीमराव लांडे, ज्ञानेश्‍वर देवीदास म्हैसागर, सोपान वामन मालठाणे, किशोर भीमराव लांडे, गणेश गराडे हे सार्वजनिक वितरण प्रणालीतील १९ हजार ७00 किलो गहू व तांदूळ सरकारी छापाच्या पोत्यातून काढून खासगी पोत्यात भरताना आढळून आले. सदर सरकारी धान्य काळाबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होते. त्यासाठी त्यांच्याजवळ अशोक लेलँड कं पनीचा ट्रक (एम.एच. ३0 ए.बी. ४५९0) आणि महिंद्र पीकअप (एमएच २८ - ८२४५) ही वाहने तसेच पोते शिवण्याचे मशीन, इलेक्ट्रिक वजन काटा असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल तसेच दोन्ही वाहने आणि आरोपींना बोराखेडी पोलीस ठाण्यात आणले. ही कारवाई हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकूर, विजय दराडे, विजय मुंढे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी केली. जप्त केला धान्यसाठा ४ लाख ३३ हजारांचा पकडण्यात आलेला १९ हजार ७00 किलो शासकीय गहू व तांदुळाची बाजार भावाप्रमाणे ४ लाख ३३ हजार ४00 रुपये किंमत आहे. यामध्ये १५ हजार ८५0 किलो तांदूळ, १ हजार ५00 किलो गहू ट्रकमध्ये आढळून आला, तर २२ पोत्यांमध्ये ११00 किलो तांदूळ, २0 पोत्यांमध्ये १000 किलो तांदूळ आणि चार पोत्यांमध्ये २00 किलो गहू असा २३५0 किलो धान्य महिंद्रा पीकअपमध्ये आढळून आले. महसूल विभागाचे निरीक्षक भगवान कुकडे यांनी सदर माल शासकीय वितरण प्रणालीचा असल्याचे सिद्ध करून पंचनामा केला.

Web Title: Four lakh wheat and rice were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.