मृत विश्वंभर मांजरे गावामध्ये पाणी साेडण्याचे काम करीत हाेते. त्यामुळे त्यांचा ऋणानुबंध प्रत्येक कुटुंबाशी जुळला होता. त्यांच्या अपघाती निधनाने अख्खा गाव हळहळला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना उपसरपंच भगवानराव उगले यांनी गावकऱ्यांना मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी तब्बल चार लाख रुपये जमा केले. तसेच ही रक्कम २१ मार्चराेजी मृताच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द करण्यात आली. त्यासाठी उपसरपंच भगवानराव उगले, सरपंचपती बंडू उगले, गुलशेर खासाब माजी सरपंच अहेमदयारखा, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यारखा, रवी वायाळ, हनीफ बागवान, गोपाल टाले, नामदेव उगले, बबन काकडे, आशिष बियाणी, पोलीसपाटील पांडुरंग सोनवणे, पत्रकार भगवान साळवे, पत्रकार वसीम शेख, पत्रकार फकिरा पठाण, पवन दाभेरे आदींनी गावात फिरून दोन दिवसांमध्ये तब्बल चार लाख रुपये जमा केले.
विश्वंभर मांजरेच्या कुटुंबाला चार लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST