ट्रक-अॅपेच्या अपघातात ४ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 14:17 IST2017-08-16T14:13:17+5:302017-08-16T14:17:23+5:30

ट्रक-अॅपेच्या अपघातात ४ ठार
बुलडाणा - बुधवारी सकाळी मजुरीसाठी अॅपे रिक्षातून जाणाऱ्या मजुरांच्या रिक्षाला भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं धडक दिली. या अपघातात रिक्षामधील चार मजुर प्रवाशांचा मृत्यु झाला असून इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.
बुलडाणा येथील ईक्बाल चौक परिसरात राहणारे हे मजूर कामासाठी बाळापूर इथे जात होते. यावेळी अॅपे रिक्षातून एकूण दहा प्रवासी प्रवास करत होते. त्याचवेळी अकोला - खामगाव या मार्गावरील टेंभूर्णा फाट्यावर या रिक्षाला ट्रकनं जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षातील चौघा प्रवाशांचा जागीच मृत्यु झाला.
गंभीर जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार झाला होता. मात्र, खामगाव ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे.