शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

जिल्ह्यात चार अपघातात सात ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:43 AM

बुलडाणा : जिल्ह्यात १२ तासांत झालेल्या तीन अपघातांमध्ये   सात जण ठार झाले, तर एकजण जखमी झाला आहे. चिखली,  बुलडाणा आणि जळगाव जामोद, खामगाव तालुक्यात टेंभुर्णा  फाटा येथे हे अपघात झाले आहेत.

ठळक मुद्देघातवार : चिखलीनजीक तीन, जळगाव जामोदमध्ये दोन, तर  बुलडाणा-खामगावमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात १२ तासांत झालेल्या तीन अपघातांमध्ये   सात जण ठार झाले, तर एकजण जखमी झाला आहे. चिखली,  बुलडाणा आणि जळगाव जामोद, खामगाव तालुक्यात टेंभुर्णा  फाटा येथे हे अपघात झाले आहेत. पहिल्या घटनेत चिखलीहून  बुलडाणाकडे जाणार्‍या दुचाकी वाहनास अपघात होऊन  दुचाकीवरील तिघे जण मृत्युमुखी पडले. २ नोव्हेंबर रोजी  मध्यरात्री मालगणी पुलावर ही घटना घडली आहे.हातणी येथील आकाश मोरे, बुलडाणा येथील तिलक झिने आणि  विशाल शिंदे हे तिघे जण रात्री २ वाजेच्या सुमारास एमएच २८  एटी ४८८६ क्रमांकाच्या दुचाकीने चिखलीहून बुलडाणाकडे जात  असताना मालगणी पुलावर अपघात होऊन दुचाकी पुलाच्या  कठड्यावरून थेट नदीत कोसळल्याने दुचाकीवरील तिघे जण  नदीपात्रात फेकेल्या गेले. पात्रात पाणी कमी असल्यामुळे  ितघांनाही जबर मार लागल्याने आकाश मोरे व तिलक झिने या  दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर विशाल शिंदे गंभीर जखमी  झाला. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आल्यानंतर  नागरिकांनी या अपघातील गंभीर जखमी विशाल शिंदे यास   बुलडाण्याला हलविले; मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.    अपघाताची घटना रात्री घडून तिघेही नदीपात्रात पडल्याने घटना  कोणाच्या लक्षात आली नाही, त्यामुळे मदत मिळू शकली नाही.  याप्रकरणी  सुधीर मोरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल  केला आहे. पुढील तपास ठाणेदार देशमुख यांच्या मार्गदर्शनात  पोउपनि गव्हाणे करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत निलगाय ठार चिखली ते बुलडाणा मार्गावर रस्ता ओलांडत असताना बोलेरो या  वाहनाच्या धडकेत ३ नोव्हेंबर रोजी नीलगायीचा मृत्यू झाला. चि खली बुलडाणा मार्गावरील पांढरे व हिवाळे यांच्या शेताजवळ दु पारी १२.३0 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

ट्रक अपघातात क्लीनरचा जागीच मृत्यूबुलडाणा : भरधाव जाणार्‍या ट्रकचे अचानक टायर फुटल्यामुळे  ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. या अपघातात  ट्रकखाली दबल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३  नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास राजुर घाटात  घडली. बुलडाण्यावरून माल घेऊन ट्रक मलकापूरकडे जात हो ता. घाटातील हनुमान मंदिराजवळ येताच ट्रकचे टायर फुटून  चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटला.  या अपघातात ट्रकखाली दबल्याने क्लीनर शेख हसन (५८, रा.  मलकापूर) याचा जागीच मृत्यू झाला. चालक जखमी आहे. ट्रक  मात्र चकनाचूर झाला. या अपघातामुळे बुलडाणा मोताळा  मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. अपघाताची माहिती  मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक  सुरळीत केली. 

हनवतखेड फाट्यानजीक दुचाकी अपघात दोघांचा मृत्यूवडगाव गड : वडगाव गड-धानोरा रस्त्यावर हनवतखेड  फाट्यावर मोटारसायकलचा अपघात होऊन दोन जण जागीच  ठार झाल्याची घटना शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.  विजय श्रीराम वाडे (वय ४0) रा. पिंप्री खोद्री ता. जळगाव  जामोद व इच्छापूर (वरद) ता. शेगाव येथील शंकर तुकाराम  शेगोकार (वय ३५) हे हनवतखेड येथे चराईकरिता पाठविलेली  गुरे आणण्यासाठी गेले होते. ते हनवतखेडवरून मोटारसायकल  क्रमांक एमएच २८ एएल ५९४५ ने परत येत असताना वडगाव,  धानोरा, हनवतखेड चिमट्यावर त्यांचे मोटारसायकलवरील  नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटारसायकल पळशी शिवारातील गट  नं.९४ या शेतात सरळ घुसली. मोटारसायकलवरील दोघे रस्त्या पासून २५ ते ३0 फूट कपाशीच्या शेतात पडले, तर  मोटारसायकल १५ ते २0 फूट पुढे जाऊन पडली. सदर  मोटारसायकलस्वार दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी  जळगाव जामोद पोलिसांची कार्यवाही वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.  यावेळी वडगाव गड पोलीस पाटील गजानन वारूकार, धानोरा  (महासिद्ध) पोलीस पाटील संघपाल अवचार, पळशी सुपो  पोलीस पाटील शंकर फाळके उपस्थित होते. 

मालवाहू वाहनाचे दुचाकीस धडकखामगाव :  मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने एक जण  ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना खामगाव तालु क्यातील टेंभुर्णा फाटा येथे घडली. खामगाव येथील अतुल गाडे,  विकास रमेश खरात, गौरव गजानन पैठणकर हे दुचाकी  क्र.एमएच २८ एसी ६५७८ ने जात होते. दरम्यान, समोरून येत  असलेल्या मालवाहू वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली.  यामध्ये अतुल गाडे जागीच ठार झाला, तर इतर दोघे गंभीर ज खमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघात