बुलडाणा जिल्ह्यात चार अपघातात २ ठार
By Admin | Updated: June 28, 2016 01:35 IST2016-06-28T01:35:27+5:302016-06-28T01:35:27+5:30
बुलडाणा जिल्ह्यात चार अपधातात २ जण ठार तर ४ जण जखमी झाले.

बुलडाणा जिल्ह्यात चार अपघातात २ ठार
बुलडाणा : जिल्ह्यात सोमवारी झालेल्या विविध ठिकाणी झालेल्या चार अपधातात २ जण ठार तर ४ जण जखमी झाले. नांदुरा येथे दोन भरधाव ट्रकची समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात एकजण ठार तर नऊ जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १0 वाजता नांदुरा मार्गावरील चिखली- आमसरी जवळ घडली. जखमींमध्ये चिखली तालुक्यातील हरणी येथील मजुरांचा समावेश आहे. या अपघातात एकनाथ जाधव हे ठार झाले आहेत तर नऊजण जखमी झाले. जिल्ह्यातील दुसर्या अपघातात किनगावराजा येथील जोडवड परिसरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात १ जन ठार झाल्याची घटना २७ जून रोजी रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात शरद नवृत्ती तौर यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. तसेच लोणार तालुक्यातील दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण जखमी झालेत. दरम्यान चिखली येथून सरकारी रूग्णालयातून एका रूग्णास औरंगाबाद येथे उपचारार्थ घेऊन जात असलेल्या मलकापुरच्या शासकीय १0८ रूग्णवाहीकेचा अपघात होऊन या अपघातात मलकापुरचे दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास औरंगाबाद नजीक घडली.