माकडाच्या हल्ल्यात ४ जखमी
By Admin | Updated: May 4, 2015 01:17 IST2015-05-04T01:17:06+5:302015-05-04T01:17:06+5:30
चिखली तालुक्यातील करवंड येथील घटना.

माकडाच्या हल्ल्यात ४ जखमी
बुलडाणा : पिसाळलेल्या माकडाने तीन व्यक्तींवर हल्ला करून जखमी केले. यावेळी या माकडाला गावाबाहेर काढण्यासाठी गेलेला एक युवकाही जखमी झाल्याची घटना चिखली तालुक्यातील करवंड येथे ३ मे रोजी घडली. या चारही जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एका माकडाने करवंड गावात शिरून ३ मे रोजी सकाळी नासधूस सुरू केली. या दरम्यान माकडाने गावातील शंकर लक्ष्मण चव्हाण (४८), ईश्वर देवसिंह चव्हाण (४३) तथा सतीश रमेश पवार (२६) या तिघांना चावा घेतला. या माकडाचा हल्ला रोखण्यासाठी गेलेल्या परशराम कनिकराम राठोड (३0) हा युवकही जखमी झाला. या चारही लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. माकडाच्या या हल्ल्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.