बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ६९० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:51 IST2021-03-18T11:51:15+5:302021-03-18T11:51:26+5:30

Coronavirus News कोरोनामुळे जिल्ह्यात बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Four corona victims in Buldana district, 690 positive | बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ६९० जण पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ६९० जण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतकांचे वय हे ५८ ते ८५ वर्षादरम्यानचे आहे. दुसरकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या  अहवालांपैकी ५०९२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४४०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९५, दहीद ४, गोंधनखेड २, पाडळी २, धाड ८, अंबोडा २, गिरडा ३, शिरपूर २,  चिखली ५७, टाकरखेड हेलगा २, उंद्री ४, भालगाव ३, सोमठाणा २, कोनड ३, खैरव २, इसरूळ २, किन्ही नाईक २, काटोडा ३, बोरगाव काकडे ३,  शेलसूर २, खंडाळा ३, ढासाळवाडी ३, मलगी ९, नायगाव २, पांढरदेव २, दे. घुबे २, मेहकर १०, दौलत गव्हाण २, हिवरा आश्रम २, जानेफळ २,  जळगाव जामोद ६, नांदुरा  २७, महाळुंगी २, आलमपूर २, नारखेड २, वडनेर ९, टाकळी २, शेलगाव बाजार २, किन्होळा ६, पिं. देवी २, बोराखेडी ७, मोताळा २३,   शेगाव ७४, जलंब २, खामगाव ५५, लाखनवाडा ६, पिंप्री देशमुख १, आवार २, चिंचपूर ७, आंबेटाकळी २, मलकापूर १९, नरवेल ३, लासुरा ६,  कुंड बु. २०, लोणवडी ४, भोसा २,  रताळी ६, साखरखेर्डा ४, वसंत नगर ७, सावखेड तेजन २,  दे. राजा २५, दे. मही ३, सिनगाव जहा १०, लोणार ८, जळगाव जिल्ह्यातील हरणखेड येथील एक, अकोला जिल्ह्यातील कसुरा, माळेगाव, काजीखेड येथील प्रत्येकी एक जण कोरोना बाधितांचा यात समावेश आहे. 
दरम्यान खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती, शेगाव तालुक्यातील लासुरा  येथील ८५ वर्षीय व्यक्ती, चिखली शहरातील सुभाषनगरमधील ५८ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ८५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी ३०४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

Web Title: Four corona victims in Buldana district, 690 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.