मारहाण प्रकरणातील चार आराेपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:32 IST2021-03-06T04:32:21+5:302021-03-06T04:32:21+5:30

शेख आरिफ शेख सत्तार यांनी पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत अन्रार कुरेशी, सादिक कुरेशी, एजाज कुरेशी, सज्जू कुरेशी (सर्व रा. मोताळा) ...

Four accused in assault case arrested | मारहाण प्रकरणातील चार आराेपींना अटक

मारहाण प्रकरणातील चार आराेपींना अटक

शेख आरिफ शेख सत्तार यांनी पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत अन्रार कुरेशी, सादिक कुरेशी, एजाज कुरेशी, सज्जू कुरेशी (सर्व रा. मोताळा) यांनी वाद घातल्याचे म्हटले हाेते. तसेच आरोपी अबरार कुरेशी याने शेख आरिफ यांच्या कपाळावर तलवार मारून जखमी केले हाेते. प्रकरणी पोलिसांनी उपरोक्त चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या गटातील शेख अब्रार शेख गफ्फार यांच्या तक्रारीवरून शेख आरिफ शेख सत्तार, शेख शरीफ शेख सत्तार, शेख आसिफ शेख सत्तार अधिक एक जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला हाेता. पोलिसांनी आरोपी अन्रार कुरेशी, सादिक कुरेशी, एजाज कुरेशी, सज्जू कुरेशी यांना अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, चौघांची जामिनावर सुटका झाली आहे.तसेच आरोपी शेख आरिफ शेख सत्तार, शेख शरीफ शेख सत्तार, शेख आसिफ शेख सत्तार अधिक एक असे चौघे आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Four accused in assault case arrested