चार फरार आरोपीं पोलिसांच्या जाळय़ात

By Admin | Updated: March 9, 2017 01:35 IST2017-03-09T01:35:03+5:302017-03-09T01:35:03+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; चार आरोपींना दिले मेहकर पोलिसांच्या ताब्यात.

Four absconding accused in a police machete | चार फरार आरोपीं पोलिसांच्या जाळय़ात

चार फरार आरोपीं पोलिसांच्या जाळय़ात

बुलडाणा, दि. ८- बुलडाणा जिल्हय़ातील फरार आरोपींचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार फरार आरोपींना ताब्यात घेऊन मंगळवारी मेहकर पोलिसांच्या ताब्यात दिले.
अटक करण्यात आलेल्या नितीन रमेश अवसरमोल (३0) रा.सुलतानपूर, माधव नामदेव दळवी (४५ )रा. मेहकर या दोन आरोपींवर शस्त्रास्त्रे बाळगणे तसेच मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तर मेहकर येथील अन्य दोन फरार आरोपी योगेश अशोक ठाकूर (२३) प्रभाकर कैलास सुरुशे (३२) यांना अटक करण्यात आली. त्याच्यावर आरोपींवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या चारही आरोपींना महेकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Four absconding accused in a police machete