शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिकांची संवेदनशीलता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 9:48 PM

माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसनेते मुकुल वासनिक यांच्या संवेदनशीलतेमुळे रस्ता अपघातातील एका ट्रक चालकाला वेळेवर उपचार मिळाले.

अनिल गवई  

खामगाव: माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसनेते मुकुल वासनिक यांच्या संवेदनशीलतेमुळे रस्ता अपघातातील एका ट्रक चालकाला वेळेवर उपचार मिळाले.  ट्रकमध्ये फसलेल्या इसमाला बाहेर काढून वासनिक यांनी आपल्या ताफ्यातील वाहनाद्वारे तात्काळ रुग्णालयात पोहोविले. माजी केंद्रीय मंत्री तथा काँगे्रस नेते  मुकुल वासनिक स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानी मलकापूर येथून सांत्वन भेटीसाठी खामगावकडे येत होते. तत्पूर्वी लांजूड फाट्यानजीक एका ट्रकचालकाने समोरील वाहनाला धडक दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातील ट्रक उलटला. या अपघातात इंदूर येथील चालक गोपाल हा ट्रकच्या केबीनमध्ये अडकला. त्याला मुकुल वासनिक यांनी स्वत: बाहेर काढून आपल्या ताफ्यातील वाहनाद्वारे खामगाव येथील सामान्य रूग्णालयात पाठविले. यावेळी काँग्रेसनेते रामविजय बुरूंगले, विजय गुरव, प्रतिक बुरूंगले, बबलू मालठाणे यांनी जखमी गोपाल याला सामान्य रुग्णालयात भरती केले.

वासनिक यांच्याकडून चौकशी!

अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या गोपाल याला जखमी अवस्थेत केबीनमधून बाहेर काढल्यानंतर वासनिक यांनी रामविजय बुरूंगले यांच्या वाहनाद्वारे तात्काळ सामान्य रुग्णालयात पाठविले. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर मुकुल वासनिक यांनी पुन्हा सामान्य रुग्णालयात जावून जखमी गोपाल आणि त्याच्यावरील उपचारासंदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रसेनजीत पाटील, रामविजय बुरूंगले, धनंजयदादा देशमुख, विजय अंभोरे आदी काँग्रेस पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.