Former soldier committed suicide by jumping into the well with two children | माजी सैनिकाची दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या
माजी सैनिकाची दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील आंबेटाकळी येथील एका माजी सैनिकांने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे आंबेटाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोपाल चराटे (४२) असे मृतक माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांनी खुशी गोपाल चराटे (१३) आणि यश यश गोपाल चराटे (११) या दोन मुलांसह रविवारी रात्री आंबेटाकळी शिवारातील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. सकाळी तिघांचेही प्रेत विहिरीत तंरगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या का केली? याचे कारण समजु शकले नाही. घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
(प्रतिनिधी)


Web Title: Former soldier committed suicide by jumping into the well with two children
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.