माजी सरपंच परिहार ट्रकच्या धडकेत ठार
By Admin | Updated: May 25, 2017 00:47 IST2017-05-25T00:47:52+5:302017-05-25T00:47:52+5:30
बुलडाणा : लग्न आटोपून घराकडे परतणाऱ्या शिवदास भगवान परिहार यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात परिहार ठार झाले.

माजी सरपंच परिहार ट्रकच्या धडकेत ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लग्न आटोपून घराकडे परतणाऱ्या शिवदास भगवान परिहार यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात परिहार ठार झाले. २२ मे रोजी रात्री बेराळा ते मेहकर फाट्याच्या दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार चिखली तालुक्यातील मलगी येथील नातेवाईकाचे लग्न आटोपून शिवदास परिहार रात्री ८.३० वाजेच्या सुमारास परतीला निघाले. बेराळा ते मेहकर फाट्यादरम्यान मागून येणाऱ्या ट्रक क्र. एमपी ०७ एचबी २२२८ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते रस्त्यावर फेकल्या गेले. गंभीर जखमी अवस्थेत प्रथम चिखलीमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घेवून जात असतानाच त्यांची प्राणज्योत विझली. मृतक शिवदास परिहार हे भालगावचे माजी सरपंच तसेच सावित्रीबाई फुले विद्यालयाचे संस्थापक सचिव होते.