माजी राज्यमंत्री सावजींची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
By Admin | Updated: October 11, 2014 23:26 IST2014-10-11T23:26:16+5:302014-10-11T23:26:16+5:30
बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेसाठी उमेदवारी देताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप.

माजी राज्यमंत्री सावजींची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
डोणगाव (बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ११ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
सावजी यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच प्रदेश प्रतिनिधी पदाचा राजीनामा फॅक्सद्वारे पाठविला आहे. पक्षाने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात उमेदवारी देताना जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे पक्षातील सदर पदाचा राजीनामा दिला असल्याचे सावजी यांनी सांगितले. या निर्णयामुळे मेहकर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.