माजी मंत्री तथा आ. कुटेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST2021-04-20T04:36:18+5:302021-04-20T04:36:18+5:30
दुसरीकडे माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय कुटे यांच्या वाहनावरील कथितस्तरावरील दगडफेक आणि हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर बुलडाणा शहरातील वातावरण ...

माजी मंत्री तथा आ. कुटेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न
दुसरीकडे माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय कुटे यांच्या वाहनावरील कथितस्तरावरील दगडफेक आणि हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर बुलडाणा शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. भाजपचे आमदार द्वय डॉ. कुटे आणि श्वेता महाले यांनी पुन्हा बुलडाण्यात येण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्वत: जुना मलकापूर नाका गाठून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. कुटे हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. तर दोन आमदारांनाही पोलिस संरक्षण देऊ शकत नाही, याबद्दल आ. श्वेता महाले यांनी एसपींकडे खेद व्यक्त केला. यावेळी घोषणाबाजी करत त्यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. सायंकाळी सात वाजतापर्यंत पोलिस अधीक्षकांच्या दालनात आमदार कुटे, श्वेता महाले, माजी. आ. विजयराज शिंदे यांची पोलिस अधीक्षकांशी चर्चा सुरू होती. मात्र चर्चा कुठल्याही निर्णयाप्रत आली नव्हती.