राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष सोपानराव साठे यांचे निधन

By Admin | Updated: June 20, 2015 02:54 IST2015-06-20T02:54:45+5:302015-06-20T02:54:45+5:30

जि.प. सदस्य सोपानराव साठे यांचे १९ जून रोजी दुपारी २.३0 वाजेच्या सुमारास आजाराने निधन झाले.

Former district president Sopanrao Sathe passed away | राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष सोपानराव साठे यांचे निधन

राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष सोपानराव साठे यांचे निधन

मलकापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान जि.प. सदस्य सोपानराव साठे यांचे १९ जून रोजी दुपारी २.३0 वाजेच्या सुमारास आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांचेवर उपचार सुरु होते. १९ जून रोजी त्यांना नियमित तपासणीकरिता अकोला येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर ते मलकापूरकडे निघाले असता रस्त्यातच त्यांना अस्वस्थ वाटून अचानक भोवळ आली व काही समजण्याच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली. सोपानराव साठे यांचा राजकीय प्रवास हा दसरखेड ग्रामपंचायत येथून सुरु झाला. दसरखेडचे सरपंच, मलकापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, ३ वेळा जिल्हा परिषद सदस्य, जि.प. कृषी सभापती, जि.प. उपाध्यक्ष यासारखी पदे त्यांनी भूषविली. नेहमीच त्यांनी सर्वसामान्यांना हवी ती मदत केली. शुक्रवारी अचानक त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून दसरखेडवासी तथा साठे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पश्‍चात पत्नी व मुली असा आप्त परिवार आहे. त्यांचेवर शनिवार २0 जून रोजी सकाळी १0 वाजेचे सुमारास दसरखेड येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Web Title: Former district president Sopanrao Sathe passed away