सरपंचपदासाठी इच्छुकांची माेर्चेबांधणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:11+5:302021-02-05T08:36:11+5:30
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने कोण सरपंच होणार यात चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ...

सरपंचपदासाठी इच्छुकांची माेर्चेबांधणी सुरू
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने कोण सरपंच होणार यात चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप मिळून निवडणूक लढविली असता १७ पैकी १६ सदस्य निवडून आले. त्यात भाजपचा आणि काँग्रेसचा एक एक सदस्य आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ सदस्य असल्याने तिघे सरपंचपदासाठी इच्छुक आहेत. निर्णय मात्र पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे घेणार असल्याने वेळेवर कुणाचे नाव जाहीर होते, हे त्याच दिवशी स्पष्ट हाेणार आहे. साखरखेर्डाबरोबरच सर्वसाधारणसाठी उमनगाव, भंडारी, हिवरा गडलिंग, जळगाव, डावरगाव, दत्तापूर, वसंतनगर, सोनोशी आणि किनगावराजा तर सर्वसाधारण महिला राखीवसाठी गोरेगाव, जागदरी, देऊळगाव कोळ, पिंपळगाव लेंडी, कोनाटी, विझोरा, चिंचोली जहांगीर, धांदरवाडी, वाघोरा, हनवतखेड (सिंदखेडराजा), नाईकनगर, वडाळी या राखीव आहेत. ना.मा.प्र.साठी लिंगा पांग्रीकाटे, राजेगाव, शेंदुर्जन, राहेरी बु., पळसखेड चक्का, भोसा, सुलजगाव, दुसरबीड तर ना.मा.प्र. महिला राखीव म्हणून सायाळा, मलकापूर पांग्रा, महारखेड, अनुसूचित जातीकरिता हनवतखेड (मलकापूर पांग्रा) , डोरवी, पिंपळखुटा, पिंपरखेड बु., तर अनुसूचित जाती महिलांसाठी कंडारी, आंबेवाडी, पोफळी शिवणी, कुंबेफळ, गारखेड, खामगाव या ग्रामपंचायतींवर नवीन सरपंच विराजमान होणार आहेत. सहाही गावांत एक एक महिला अनुसूचित जातीमधून निवडून आल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.