अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची धाड, स्वीटमार्ट अन् हॉटेल्समध्ये केली तपासणी 

By महेश गलांडे | Published: November 15, 2020 07:59 PM2020-11-15T19:59:11+5:302020-11-15T20:00:33+5:30

बुलढाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजार गल्ली येथील 12 ते 15 खाद्य पदार्थाचे स्टॉल व स्वीट मार्टची यावेळी तपासणी केली. यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख, खाण्यास योग्य असल्याची अंतिम तारीख, परवाना, खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किंवा नाही

Food and Drug Administration raids Sweetmart and hotels in buldhana | अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची धाड, स्वीटमार्ट अन् हॉटेल्समध्ये केली तपासणी 

अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची धाड, स्वीटमार्ट अन् हॉटेल्समध्ये केली तपासणी 

Next
ठळक मुद्देबुलढाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजार गल्ली येथील 12 ते 15 खाद्य पदार्थाचे स्टॉल व स्वीट मार्टची यावेळी तपासणी केली. यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख, खाण्यास योग्य असल्याची अंतिम तारीख, परवाना, खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किंवा ना

बुलढाणा - देशात दिवाळीचा आनंद असून कोरोना लॉकडाऊननंतर पहिलाच सण उत्साहात साजरा होताना दिसत आहे. या सणासुदीच्या दिवसांमुळे बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सर्वच धंद्यांमध्ये तेजी दिसत असून बाजारामध्ये मिठाईची व फराळाची दुकाने लागली आहेत. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई व फराळ मिळतो का याची तपासणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: नुकतीच पाहणी केली आहे.

बुलढाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजार गल्ली येथील 12 ते 15 खाद्य पदार्थाचे स्टॉल व स्वीट मार्टची यावेळी तपासणी केली. यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख, खाण्यास योग्य असल्याची अंतिम तारीख, परवाना, खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किंवा नाही, पदार्थ बनविणारे कारागीर हातांची स्वछता राखतात की नाही, ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनविले जातात त्याठिकाणी स्वच्छता आहे की नाही याची तपासणी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे यांनी केली. ज्या दुकानदारांनी नियमांचे पालन केलेले नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. एन दिवाळीच्या दिवशी स्वतः मंत्र्यांनी सुरू केलेल्या या धडक कारवाई मुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये जरब बसणार आहे.


महाराष्ट्रातही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्वत्र विद्युत रोषणाई दिसून येत आहे, फटकांच्या आतिषबाजी आणि मिठाईचे स्टॉलही मोठ्या प्रमाणात लागले आहेत. त्यामुळेच, अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी नागरिकाची काळजी म्हणून मिठाईच्या दुकानाला भेट देत वस्तूंची पाहणी केली. 
 

Web Title: Food and Drug Administration raids Sweetmart and hotels in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.