चारा दुपटीने महागला!

By Admin | Updated: November 23, 2015 01:16 IST2015-11-23T01:16:51+5:302015-11-23T01:16:51+5:30

अवर्षणाचा फटका आता गुरांनाही बसत असून, हिवाळ्याच्या प्रारंभीच चा-याचे दुपटीने भाव वाढले.

Fodder double expensive! | चारा दुपटीने महागला!

चारा दुपटीने महागला!

अनिल गवई/खामगाव : अवर्षणाचा फटका आता गुरांनाही बसत असून, चार्‍याचे हिवाळ्याच्या प्रारंभीच दुपटीने भाव वाढले आहेत. ग्रामीण भागात दहा ते बारा रुपयांत मिळणारी चार्‍याची एक पेंडी २५-३0 रुपयांना मिळत असून, गुरांच्या संगोपनाचा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असलेल्या खामगाव परिसरातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झाले आहेत. यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम धोक्यात आला. अत्यल्प चार्‍यामुळे जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ६८८ दुभत्या जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन हिवाळ्याच्या प्रारंभालाच खामगाव तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात चाराटंचाई जाणवत असल्यामुळे शासनाने वैरण विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. चारा आणि वैरण विकास कार्यक्रमासाठी शासनाने जिल्ह्यासाठी २७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला; मात्र या कार्यक्रमाची संभाव्य यश पाहता, उन्हाळ्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच चार्‍याची साठवणूक चालविली आहे. त्यामुळे बाजारात चारा उपलब्ध होत नसल्याने गेल्या वर्षी १0-१२ रुपयांना सहज उपलब्ध होत असलेल्या चार्‍याची पेंडी आता चक्क २५-३0 रुपयांवर पोहोचली आहे.

Web Title: Fodder double expensive!