तुरीच्या गंजीला आग

By Admin | Updated: January 28, 2016 23:32 IST2016-01-28T23:27:44+5:302016-01-28T23:32:45+5:30

शेलापूर खुर्द येथील घटना; २ लाख ७५ हजारांचे नुकसान.

Flutter fire | तुरीच्या गंजीला आग

तुरीच्या गंजीला आग

मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील शेलापूर खुर्द येथील एका शेतकर्‍याच्या शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावून दिल्याने २ लाख ७५ हजार रूपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी सकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या शेलापूर खुर्द येथील शेतकरी बारसू सुधाकर पाटील यांनी फिर्याद दिली की, यावर्षी त्यांच्या गट नं ७१ मधील शेतात २ हेक्टर २८ आर क्षेत्रातील बागायती तुरीची गंजी लावून ठेवली होती. तीन लाख रुपये किमतीच्या आसपास तुरीपासून उत्पादन होण्याची अपेक्षा पाटील यांना होती. दरम्यान, २७ ते २८ जानेवारीच्या रात्रीतून अज्ञात इसमाने तुरीच्या गंजीला आग लावून दिली. गुरूवारी सकाळी तुरीची गंजी आगीने जळून खाक झाल्याचे त्यांना निदर्शनास पडले.
यामध्ये शेतकर्‍याचे २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तलाठी एन. एल. वायडे यांनी गुरुवारला सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, तसा अहवाल महसूल विभागाला पाठविला आहे. तालुक्यात यावर्षी नापिकी असून, तुरीची गंजी खाक झाल्याने या शेतकर्‍यावर जणू आभाळच कोसळले आहे.
याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ४३५ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बीट जमादार बावस्कार करीत आहेत.

Web Title: Flutter fire