एसटी पासेससाठी झुंबड

By Admin | Updated: July 7, 2014 22:35 IST2014-07-07T22:35:41+5:302014-07-07T22:35:41+5:30

ग्रामीण विद्यार्थ्यांची सवलतीच्या एसटी प्रवासाला पसंती

The flute for ST passes | एसटी पासेससाठी झुंबड

एसटी पासेससाठी झुंबड

खामगाव: ह्यशिक्षण हे वाघिणीचे दूध असते, जो पिणार तो गुरगुरुणारह्ण ही म्हण सत्यात उतरविण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरी भागात येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. काही विद्यार्थी शहरी भागात रुम करुन तर काही गावात राहून शहरात शिक्षण घेतात. घरी राहून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांंची एस.टी.पासेससाठी एकच गर्दी होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सवलत पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दहावीपर्यंंतच्या ग्रामीण भागातील मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत पास देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव हे दुसरे मोठे महत्वाचे ठिकाण असून या शहरात इंजिनिअरींग, पॉलीटेक्नीक, विज्ञान, वाणिज्य आणि कला महाविद्यालयासोबतच विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणार्‍या मोठय़ा संस्था आहेत. या शिवाय एक चित्रकला महाविद्यालयही येथे आहे. एकंदरीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी खामगाव शहरात शिक्षणाचे मोठे दालन उपलब्ध असल्यामुळे खामगाव तालुक्यासह, जळगाव, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, शेगाव, मेहकर, चिखली यासोबतच अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यातील विद्यार्थी मोठय़ासंख्येने खामगावात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे खामगाव आगारात सवलत पासेससाठी विद्यार्थ्यांंची चांगलीच गर्दी होत आहे. या वर्षीच्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाल्यापासूनच सवलत पासेससाठी विद्यार्थ्यांंची धडपड सुरू आहे. १३ एप्रिल २0१४ पासून सवलतपास वितरणास सुरूवात करण्यात आली. उन्हाळ्यात संगणक आणि टायपिंग परीक्षेसाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांंना सवलत पास देण्यात आल्या. त्यानंतर आता विविध शाळा, महाविद्यालय नियमितपणे सुरु झाले आहेत. त्यामुळे एस.टी.महामंडळाच्या येथील आगारातून विद्यार्थ्यांंना पासेस वितरीत केल्या जात आहेत.

Web Title: The flute for ST passes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.