पाटाचे काम पुन्हा नव्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:48+5:302021-02-05T08:32:48+5:30

खडकपूर्णा प्रकल्पअंतर्गत डाव्या कालव्यातून टप्पा क्रमांक चारमधून रामनगर ते कोनड खुर्दपर्यंत पाणी पोहोचवले जाते. त्यातून देऊळगाव घुबे, अमोना शिवारात ...

Flood work again | पाटाचे काम पुन्हा नव्याने

पाटाचे काम पुन्हा नव्याने

खडकपूर्णा प्रकल्पअंतर्गत डाव्या कालव्यातून टप्पा क्रमांक चारमधून रामनगर ते कोनड खुर्दपर्यंत पाणी पोहोचवले जाते. त्यातून देऊळगाव घुबे, अमोना शिवारात पाटाचे काम सुरू असून या कामात रेतीचा लिलाव झाला नसल्याने रेतीऐवजी मातीमिश्रित डस्ट वापरल्या जात असल्याची तक्रार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पैठणे यांनी केली होती. तात्काळ हे काम बंद केले नाही तर आंदोलनाचा इशारासुद्धा दिला होता. अखेर प्रशासनाने आपली चूक मान्य करून देऊळगाव घुबे -कोणड या रस्त्यावर सुरू असलेला पाटाच्या बाजूच्या दोन्ही पुलाला अखेरपर्यंत खोदून नवीन करण्याचे काम सुरू केले आहे. या पुलामुळे व चालू असलेल्या पुलाच्या कामामुळे रेती वापरल्याने हा पूल मजबूत होईलच. इतरही ठिकाणच्या कामावर त्यांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर व अभियंत्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा सर्व कामाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाई सिद्धार्थ पैठणे यांनी केली आहे.

Web Title: Flood work again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.