शेलोडीत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:56+5:302021-02-05T08:31:56+5:30

शेलोडी येथे आजी-माजी सैनिकांची संख्या लक्षणीय आहे. स्वातंत्र्यदिनी तसेच प्रजासत्ताकदिनी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे, अशी येथील तरुणांची अनेक दिवसांपासून ...

Flag hoisting by ex-servicemen at Shelodi | शेलोडीत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

शेलोडीत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

शेलोडी येथे आजी-माजी सैनिकांची संख्या लक्षणीय आहे. स्वातंत्र्यदिनी तसेच प्रजासत्ताकदिनी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे, अशी येथील तरुणांची अनेक दिवसांपासून इच्छा होती. त्यासाठी त्यांनी युवा संघाच्या मदतीने गावातील बसस्थानकाच्या चौकात एक ध्वजस्तंभ उभारून तेथे गावातील कार्यरत आजी-माजी सैनिक, सुरक्षा दलात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नावाचा फलक लावला असून ‘आम्हाला आपला अभिमान आहे,’ असे नमूद करून सन्मान केला. २६ जानेवारी रोजी गावातील व परिसरातील आजी-माजी सैनिकांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. यावेळी सेवानिवृत्त सुभेदार ओंकार जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक राजेंद्र नेमाने, विश्वनाथ जायगुडे, त्र्यंबक गवई, जगन्नाथ भांबळे, बापू सकुंडे, अशोक वाघमारे, शिवाजी कदम, योगेश शेवाळे, विजय धंदर, दीपक कापसे, दीपक काळे, निवृत्ती बळप यांची उपस्थिती होती.

Web Title: Flag hoisting by ex-servicemen at Shelodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.