गतिमंद युवतीवर बलात्कारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:42 IST2017-04-26T00:42:03+5:302017-04-26T00:42:03+5:30

खामगाव : विकलांग व गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्षे कारावास व दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी मंगळवारी सुनावली.

Five years of punishment for raping a pregnant woman | गतिमंद युवतीवर बलात्कारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

गतिमंद युवतीवर बलात्कारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

खामगाव : विकलांग व गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्षे कारावास व दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी मंगळवारी सुनावली. जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथील सिद्धार्थ चंद्रमणी तायडे (वय ३०) या विवाहित युवकाने १९ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातीलच २३ वर्षीय गतिमंद व विकलांग तरुणी घरात एकटी असल्याचे पाहुन तिच्या घराचा कुड वाकवून घरात घुसला व गतिमंद आणि विकलांग असलेल्या तरुणीवर बलात्कार केला. सदर घटना गतिमंद तरुणीच्या मोठ्या बहिणीने प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तिने याबाबत जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.
या फिर्यादीवरुन जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ चंद्रमणी तायडे याच्याविरुद्ध अपराध नंबर १३४/१३ कलम ३७६ (२) (एल), ४५२ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे यांनी केला. तपासाअंती प्रकरण खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय क्रमांक १ मध्ये न्यायप्रविष्ठ केले होते. सदर प्रकरणाचे सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे नऊ जणांच्या साक्ष तपासण्यात आल्या.
साक्षपुरावे व युक्तीवादानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने कलम ३७६ (२) (एल) मध्ये आरोपी सिद्धार्थ चंद्रमणी तायडे यास पाच वर्षे कारावास व १ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने सजा तसेच कलम ४५२ मध्ये ३ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा असा निकाल येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी दिला.
विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपीस अटक केल्यापासून तो जेलमध्ये आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जे.एम.बोदडे यांनी युक्तीवाद केला.

Web Title: Five years of punishment for raping a pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.