शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 01:39 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापुर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, हुंदाई क्रेटा कार व ट्रक अशा 5 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला.

नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापुर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, हुंदाई क्रेटा कार व ट्रक अशा 5 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 10.30 वाजेदरम्यान घडली. बसमधील 69 प्रवाशांसह दोन्ही कारमधील प्रवाशी सुरक्षित आहेत.दारव्हा आगाराची जळगाव यवतमाळ बस प्रवासी घेऊन मलकापूरवरून नांदुराकडे जात असतांना काटी फाट्याजवळ समोर ट्रॅफिक जाम असल्याने बस चालकाने बस थांबवली. त्यामागे असणारी जळगाव खान्देश येथील इनोव्हासुद्धा थांबली. कार मागील मलकापूर येथील वडनेरकडे जाणारे रेतीचे टिप्पर हे देखील वाहतूक खोळंबल्याने थांबले. त्यापाठोपाठ शिरपूर-धुळे येथील हुंदाई क्रेटा कार चालकाने समोर वाहतूक थांबली असल्याने आपल्या कारचा वेग कमी करत कार थांबवली. मात्र त्या मागून येणा-या ट्रकनं क्रेटा कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे समोरील सर्व वाहने एकमेकांवर आदळली. यावेळी कारमधील प्रवासी व बसमधील प्रवासी या अचानक घटनेने पुरते घाबरले होते.या अपघातात इनोव्हा कारसह हुंदाई क्रेटा कारचा अक्षरशा चुराडा झाला. काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बसमधील प्रवाशांना इतर बसेसमध्ये बसवून रवाना करण्यात आले असून, घटनास्थळी मलकापूर ग्रामीण पोस्टेचे बावने,पवार, कुलकर्णी पोहोचले असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात