तीन अपघातात पाच जण जखमी
By Admin | Updated: March 3, 2017 00:10 IST2017-03-03T00:10:48+5:302017-03-03T00:10:48+5:30
वेगवेगळ्या तीन अपघातात पाच जण जखमी झाल्याच्या घटना गुरुवारी घडल्या.

तीन अपघातात पाच जण जखमी
खामगाव, दि.३ - वेगवेगळ्या तीन अपघातात पाच जण जखमी झाल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. शहरानजीकच्या सजनपुरी येथील एजाज खान (वय २६) व अनिस शहा (वय २४) या दोघांना विजयालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी सकाळी अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने दोघे जखमी झाले. दुसऱ्या घटनेत कांतु देशपांडे (वय ३५) व केहुर देशपांडे (वय ४०) रा. अकोला हे कारने खामगावकडे येत असताना अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या कारला अकोला रोडवरील मोठा हनुमान मंदिराजवळ धडक दिली. सदर अपघातात दोघे जखमी झाले. तर तिसऱ्या घटनेत शिवानी नितीनकुमार पनसकर (वय २१) रा. पुरवार गल्ली ही विद्यार्थिनी गुरुवारी सकाळी ९ वाजतादरम्यान दुचाकी क्र.एमएच२८-एल२२११ ने कॉलेजमध्ये जात असताना नांदुरा येथून खामगावला येणाऱ्या काळी-पिवळी क्र.एमएच२८-आर२९६१ ने धडक दिल्याने शिवानी पनसकर ही जखमी झाली.