अंढेरा : अंढेरा फाट्यावरील पेट्रोल पंपावर दराेडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पाेलिसांच्या पथकाने २७ जून राेजी अटक केली. या आराेपींकडून पाेलिसांनी शस्त्रांसह ३ लाख ४५ हजार रुपयांचा एवज जप्त केला़
चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील अंढेरा फाट्याजवळील असलेेले पेट्रोल पंप लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखा व अंढेरा पाेलिसांच्या पथकाने गजाआड केली़ आराेपींमध्ये जगन मेहराम जाधव,लतीफ फकीर खा, दगडू शहभाजखान तडवी, सर्व रा.जोंधनखेडा जि जळगाव, विशाल प्रभाकर चांडक, रा - कुऱ्हा जि जळगाव, गोपाल रामदास भोजने रा़ काकोडा यांचा समावेश आहे़ या आराेपींकडून पाेलिसांनी कार एम.एच.०३बीई७४६३ ही जप्त केली. तसेच मिरची पुड,दोरी, तलवार,सुरा,कटावणी हे साहीत्यही जप्त करण्यात आले आहे.पंचासमक्ष यातील आरोपी जगन जाधव याने अंढेरा फाट्यावरील शहीद रामदास पेट्रोल पंप लुटण्याचा बेत होता अशी कबुली दिली.
आरोपी यांनी अनेक ठिकाणी चाेरी केली आहे़ अटक केलेल्या आराेपींना २८ जुन रोजी देऊळगाव राजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९जुन पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे़ पुढील तपास दुय्यम ठाणेदार मोहन पाटील यांच्या कडे आहे. दरम्यान, या कारवाईविषयी माहिती घेण्यासाठी अंढेराचे ठाणेदार राजवंत आठवले काॅल केला असता त्यांनी रिसिव्ह केला नाही़