देऊळगाव राजात आणखी पाच पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:33 IST2020-12-31T04:33:23+5:302020-12-31T04:33:23+5:30
मतदानाच्या दिवशीचे बाजार रद्द बुलडाणा : जिल्ह्यात १५ जानेवारी राेजी ५२७ ग्रामपंचायतींसाठी मतदान तर १८ जानेवारी राेजी मतमाेजणी हाेणार ...

देऊळगाव राजात आणखी पाच पाॅझिटिव्ह
मतदानाच्या दिवशीचे बाजार रद्द
बुलडाणा : जिल्ह्यात १५ जानेवारी राेजी ५२७ ग्रामपंचायतींसाठी मतदान तर १८ जानेवारी राेजी मतमाेजणी हाेणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान हाेत असलेल्या गावातील तसेच मतमाेजणीच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी भरणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे. बाजार दुसऱ्या दिवशी भरवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
हिवरा आश्रम येथील एक पाॅझिटिव्ह
हिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील एकाचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागात काेराेना वाढत असताना ग्रामस्थांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. अनेकजण मास्क न लावता फिरत असल्याचे चित्र हिवरा आश्रम परिसरात आहे.
विजेचा लपंडाव; रब्बी पिके धाेक्यात
सुलतानपूर : परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे रब्बी पिके धाेक्यात आली आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी १८ नाेव्हेंबर राेजी महावितरण कार्यालयात माेर्चा काढला हाेता. त्यानंतरही विजेच्या समस्या कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
निराधारांना अनुदान देण्याची मागणी
जानेफळ : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध याेजनांच्या माध्यमातून निराधारांना अनुदानाचा लाभ देण्यात येताे. मात्र, काही महिन्यांपासून निराधार लाभार्थींचे अनुदान रखडले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन निराधारांना अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.