आणखी पाच जणांचा मृत्यू, १०३५ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:32+5:302021-04-24T04:35:32+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील २०८, सुंदरखेड ५, चौथा ५, डोमरुळ ४, ...

आणखी पाच जणांचा मृत्यू, १०३५ पाॅझिटिव्ह
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील २०८, सुंदरखेड ५, चौथा ५, डोमरुळ ४, करडी ४, पिं.सराई ११, जांभरुण ४, कोलवड २, ईरला ४, ढालसावंगी ३, पाडळी ६, मासरुळ ७, मोताळा शहर ३, जयपूर ५, धा.बढे ५, घुस्सर १३, खामगाव शहर ६४, खामगाव तालुका आडगाव ६, शेगाव शहर ५, शेगाव तालुका पहुरजिरा १, चिखली शहर २९, चिखली तालुका मेरा बु. ६, सवणा ३, डोंगर शेवली २, मलकापूर शहर ८, मलकापूर तालुका उमाळी ५, धरणगाव ८, हिंगणा काझी ७, अनुराबाद ११, नरवेल ४, दसरखेड ७, कुंड, दे. राजा शहर १९, सिनगाव जहा. ३, पांगरी ३, गव्हाण ५, दे.मही २, बामखेड ६, गुंजाळा २, पिंपळखुटा ३, सिं.राजा शहर १३, सिं.राजा तालुका केशवशिवणी २, हनवतखेड ४, दरेगाव १५, साखरखर्डा ६, पिंपरखेड ४, पळसखेड १, वाघोरा १, नसिराबाद १, शेलगाव १, राहेरी १, वाकद १, मेहकर शहर ८०, हिवरा आश्रम ५, भालेगाव ६, दे.माळी ७, शेंदला ४, परतापूर ३, ब्रम्हपुरी ३, कल्याणा ५, डोणगाव ८, विश्वी ३, गोहेगाव ४, अंजनी ३, कळमेश्वर १३, वरवंड ३, पाथर्डी ३, लोणी २, वडगाव माळी ५, संग्रामपूर शहर १, संग्रामपूर तालुका बिलखेड १, वसाडी १, जळगाव जामोद शहर ५, नांदुरा शहर १५, नांदुरा तालुका निमगाव ५, वाडी ५, तरवाडी २, वडाळी ३, अंबोडा ३, पलसोडा ११, टाकारखेड २, पिंपरी आढाव ४, पोटळी ३, खंडाळा १, लोन वडी ४, लोणार शहर २, लोणार तालुका पिंपळनेर २, देऊळगाव कोळ ३, बिबी ४, कोयाळी २, चिखला येथील दाेघांचा समावेश आहे़
७ हजार ३४३ बाधितांवर उपचार सुरू
आज रोजी ४ हजार ६५८ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ३ लाख २२ हजार ९५० आहेत़ जिल्ह्यात आज अखेर एकूण ५६ हजार ७३५ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ४९ हजार ३१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ७ हजार ३४३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.