बकरी चोरणा-यास पाचशे रुपये दंड
By Admin | Updated: September 30, 2015 00:28 IST2015-09-30T00:28:37+5:302015-09-30T00:28:37+5:30
बक-या चोरून पलायन करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीस नांदुरा न्यायालयाने सुनावली पाचशे रुपये दंड व कोर्ट संपेपर्यंत कोर्टातच थांबण्याची शिक्षा.

बकरी चोरणा-यास पाचशे रुपये दंड
नांदुरा (जि. बुलडाणा): : शहरातील शिवाजी पुतळ्यानजीक बकर्या चोरून पलायन करण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीस नांदुरा न्यायालयाने पाचशे रुपये दंड व कोर्ट संपेपर्यंत कोर्टातच थांबण्याची शिक्षा २९ सप्टेंबरला सुनावली. जामनेर तालुक्यातील रतन ओंकार कल्याणकर याने २८ सप्टेंबरला नांदुर्यातून मोकाट फिरणार्या दोन बकर्या चोरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला पकडण्यात आले व पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याकडून दोन बकर्याही हस्तगत करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी बकर्यांचे मालक कमल सूर्यवंशी यांनी नांदुरा पोलिसांत रतन कल्याणकर याच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी बकर्या चोरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. जामनेर तालुक्यातील पहूर येथील तो रहिवासी आहे. त्याला २९ सप्टेंबरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाचशे रुपये दंड ठोठावला तथा कोर्ट संपेपर्यंंत न्यायालयातच थांबण्याची शिक्षा सुनावली. दरम्यान, नांदुर्यासह लगतच्या परिसरात गुरे चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या असून, पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.