आळंद गावात पाच घरे फोडली ; ग्रामस्थांमध्ये दहशत
By Admin | Updated: June 12, 2016 02:47 IST2016-06-12T02:47:53+5:302016-06-12T02:47:53+5:30
देऊळगावराजा तालुक्यातील आळंद गावात चोरट्यांचा हैदोस.

आळंद गावात पाच घरे फोडली ; ग्रामस्थांमध्ये दहशत
देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील आळंद गावात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान पाच घरात प्रवेश करून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे व मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली. सर्वप्रथम अज्ञात चोरट्यांनी आश्रृबा रोडूजी खरात यांच्या घरातून रोख सहा हजार रुपये, गजानन ज्ञानबा खार्डे यांच्या घरातील चांदीचे वाळे व छंद, राधाकिसन खार्डे यांच्या घरातून रोख २७00 रुपये, अर्जुन खार्डे यांच्या घरातून ४ हजार ७00 रुपये आणि काशिनाथ जाधव यांच्या घरातील रोख ६ हजार रुपये, दोन ग्रॅमच्या बाळ्या व ओम असा मुद्देमाल चोरून नेला. घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी पेट्या गावाबाहेर नेऊन फोडल्या व त्यातील ऐवज पसार केला व पेट्या जागीच सोडल्या. गावाबाहेर पलायन करताना अज्ञात चोरट्यांनी गावातील गणेश लक्ष्मण सानप यांची मोटरसायकल चोरून त्यावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, शनिवारी सायंकाळपर्यंंत अज्ञात चोरट्यांचा शोध लागला नव्हता.