दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST2021-02-05T08:35:01+5:302021-02-05T08:35:01+5:30

जिल्ह्यात संपत्तीविषयक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यानुषंगाने एक पथक स्थानिक गुन्हे शाखेतंर्गत गठित करण्यात आले आहे. पीएसआय नीलेश शेळके ...

Five accused arrested in preparation for robbery | दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपींना अटक

दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपींना अटक

जिल्ह्यात संपत्तीविषयक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यानुषंगाने एक पथक स्थानिक गुन्हे शाखेतंर्गत गठित करण्यात आले आहे. पीएसआय नीलेश शेळके आणि श्रीकांत जिंदमवार यांच्या नेतृत्वात गठित करण्यात आले आहे. हे पथक सोमवारी मेहकर पोलिस ठाण्यांतर्गत गस्तीवर असताना गोपनीय माहितीच्या आधारावर या पथकाने डोणगावनजीक एका पेट्रोलपंपाजवळ संदिग्ध कारमधील व्यक्तींची झडती घेतली असता उपरोक्त आरोपींना त्यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन चाकू, तीन मोबाईल, लोखंडी रॉड व कार असा मिळून चार लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे, विजय सोनोने, गजानन अहेर, नदीम शेख, सुरेश भिसे, वैभव मगर, पीएसआय विजयकुमार घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व आरोपींना अटक करण्यात ये‌ऊन त्यांना मेहकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रायगड रत्नागिरीतही चोरी

अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातही या आरोपींनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे आंतरजिल्हास्तरावर या चोऱ्यांसोबत आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपासही सध्या बुलडाणा पोलिस करत आहेत. या टोळीचा छडा लागल्यामुळे जिल्ह्यासह राज्यत अन्यत्र झालेल्या आणखी काही गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

(फोटो)

Web Title: Five accused arrested in preparation for robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.