पहिल्याच पावसात बंधा-याची माती खरडली!

By Admin | Updated: June 23, 2016 23:35 IST2016-06-23T23:35:24+5:302016-06-23T23:35:24+5:30

डोणगाव येथील बंधा-यांच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी.

In the first rainy season, the dust of the soil! | पहिल्याच पावसात बंधा-याची माती खरडली!

पहिल्याच पावसात बंधा-याची माती खरडली!

डोणगाव(जि. बुलडाणा) : डोणगाव येथे स्थानिक काच नदीच्या पात्रात शेलगाव देशमुख रोडजवळ शासनाच्यावतीने बंधारा बांधण्यात आलेला आहे. दरम्यान, डोणगाव येथे २२ जून रोजी झालेल्या ३४ मिमी पावसाने हा बंधारा तुडुंब भरला. पहिल्याच पावसात बंधार्‍याच्या बाजूने टाकलेली माती वाहून गेली. त्यामुळे बंधार्‍याचे गज उघडे पडल्याने सदर बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते, त्यामुळे या कामाची जिल्हाधिकारी यांनी स्वत: पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी डोणगाव येथील भाजपाचे कार्यकर्ते तथा शेतकरी राजू इंगळे व शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मानवतकर यांनी केली आहे.
डोणगाव येथे जिल्हा परिषद अंतर्गत बंधारे बांधण्यात आले. बंधारे नदीच्या परिपूर्ण पात्राइतके न घेता नदीत असलेल्या मातीपर्यंतच बंधारे बांधण्यात आले आहेत, तसेच सदर बंधार्‍याभोवती पिचिंग करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढे आणखी पाऊस झाल्यास बंधार्‍याच्या बाजूची माती वाहून जाऊन बंधारा फुटण्याची शक्यता आहे, तरी बंधार्‍याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी राजू इंगळे व प्रकाश मानवतकर यांनी केली आहे.

Web Title: In the first rainy season, the dust of the soil!