पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:45+5:302021-02-13T04:33:45+5:30
जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या शाळा - १०३८ विद्यार्थी - १८०९२७ कोट... मुलांना हवी शाळा आता घरी राहून कंटाळा आला ...

पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली!
जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या शाळा - १०३८
विद्यार्थी - १८०९२७
कोट...
मुलांना हवी शाळा
आता घरी राहून कंटाळा आला आहे. सरांनी आमची शाळा लवकर सुरू करावी. कारण, अभ्यास करून मला मोठं व्हायचं आहे. शाळा नसल्यामुळे मैत्रिणींची भेट होत नाही. त्यामुळे आमची शाळा लवकर उघडावी. आम्ही शाळेत जाताना मास्क लावून जाऊ पण शाळा उघडा.
श्रावणी पाठक, इयत्ता चौथी.
पालकांना चिंता...
मुलं आता घरी राहून कंटाळले आहेत. एकीकडे कोरोनाची भीती वाटते, तर दुसरीकडे मुलांच्या शैक्षणिक भविष्याची चिंता वाटते. यावर्षी शाळा बंद असल्याने मोठी अडचण झाली आहे. आता शाळा व्यवस्थापनाने खालचे वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून उर्वरित राहिलेल्या सत्राचा अभ्यास होऊ शकेल. शाळा सुरू झाल्यास आम्ही मुलांना शाळेत संपूर्ण काळजी घेवून पाठवू.
गजानन पाठक, पालक