शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील पहिली चारा छावणी आमसरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:32 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाईची स्थिती पाहता खामगाव तालुक्यातील आमसरी येथे जिल्ह्यातील पहिली चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.

- नीलेश जोशीबुलडाणा: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाईची स्थिती पाहता खामगाव तालुक्यातील आमसरी येथे जिल्ह्यातील पहिली चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, जवळपास एका दशकानंतर बुलडाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच चारा छावणी उभारण्याची वेळ आली  आहे.पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार तथा मुख्यमंत्र्यांनी आॅडीओ ब्रीजद्वारे सरपंचांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअपवर सरपंचांनी चारा छावणीची मागणी केली होती. त्यासंदर्भाने पशुसंवर्धन विभागाने नव्याने अहवाल तयार करून जिल्ह्यात जवळपास २१ चारा छावण्या उभारण्याची अवश्यकात असल्याचे म्हंटले होते. २७ मे रोजी हा सुधारीत अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ६३ हजार गुरांसाठी प्रसंगी चारा छावण्याची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र सोबतच जून २०१९ पर्यंत पुरेल ऐवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचेही नमूद केले होते. त्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने चारा छावणीबाबत गंभीरतने विचार करण्यास प्रारंभ केला होता. परिणामस्वरुप बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास एक दशकानंतरची पहिली चारा छावणी ही खामगाव तालुक्यातील पारखेड महूसल मंडळामध्ये येत असलेल्या आमसरी येथे चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी ३० मे २०१९ रोजी मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश पारनाईक यांनी दुजोरा दिला  आहे.आमसरी येथील चारा छावणीसाठीचा प्रस्ताव नांदुरा येथील महादेव गोरक्षण संस्थेने पाठविला होता. त्यास अखेर मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी अनेक कागदपत्रांची पुर्तता त्यांना करावी लागणार असून पाच लाख रुपयांची बँक गॅरंटीही प्रथमत: द्यावी लागणार आहे. दरम्यान, असे असले तरी २५ जानेवारी, १३ फेब्रुवारी, चार मे आणि १६ मे २०१९ च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत ही चारा छावणी चालवावी लागणार आहे.

चार छावणीत या सुविधा आवश्यकप्रथमत: आग प्रतिबंधक यंत्रणा, आवश्यकतेनुसार लसिकरण, मोबाईल अ‍ॅपवर दररोज गुरांच्या संख्येची नोंद आणि छावणीतील गुरांचे टॅगिंग करावे लागणार आहे. सोबतच आजारी गुरांचे लसिकरण व त्यांची स्वतंत्र  व्यवस्था ही छावणीत करावी लागणार आहे. चारा छावणी मालकाला या बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे. चारा छावणीतील गुरांपासून मिळणाºया शेणाची छावणी मालकाला विल्हेवाट लावण्याची मुभा किंवा अधिकार देण्यात आलेला आहे. 

चारा छावणीवर महसूल विभागाचे नियंत्रणजिल्ह्यात उभारण्या येणाºया या चारा छावणीवर महसूल विभागाचे पूर्णत: नियंत्रण राहणार आहे. तहसिलदार, एसडीपीओ यांना चारा छावणी उभारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात  जवळपास एका दशकानंतर चारा छावणीची उभारल्या जात आहे. दरम्यान खामगाव तालुक्यात आणखी काही चारा छावण्या उघडल्या गेल्यास एका महिन्याचा त्यासाठीचा खर्च हा चार कोटी ५० लाखांच्या घरात जाऊ शकतो. तुर्तास संपूर्ण जिल्ह्यात फक्त एका संस्थेसच चारा छावीसाठीची परवानगी देण्यात आली आहे.

एक लाक मेट्रीक टनाची होती तुटबुलडाणा जिल्ह्यात दहा लाख गुरे असून त्यांच्यासाठी वर्षाकाठी आठ लाख ४३ हजार मेट्रीक टन चाºयाची गरज भासते. पैकी  जिल्ह्यात सात लाख २७ हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध होता. एक लाख १५ हजार मेट्रीक टन चाºयाची तूट होती. मात्र रब्बी हंगामात कृषी पिकांच्या अवशेषातून ८५ हजार मेट्रीक टन आणि वाळलेला ३६ हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध झाला आहे. जून अखेर पर्यंत हा चारा पुरेल. मोठ्या गुरांना  प्रतिदिन सहा किलो तर लहान गुरांना प्रतिदिन तीन किलो चारा लागतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdroughtदुष्काळ