शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी घेणार तंबाखु मुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:05 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून विद्यार्थी तंबाखुमुक्तीची शपथ घेणार आहेत.

- अनिल उंबरकरलोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : पंचायत समिती अंतर्गत सर्व शाळांची पहिली घंटा २६ जुन रोजी वाजणार आहे. चिमुकल्यांच्या किलबिलटाने शाळा उघडणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून विद्यार्थी तंबाखुमुक्तीची शपथ घेणार आहेत.उन्हाळ्याची सुटी संपायला अवघा ८ दिवसांचा कालावधी उरला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना देऊन शैक्षणिक सत्र २०१९-२०२० च्या सत्राला सुरूवात होणार आहे. जिल्हा परिषद, खाजगी व्यवस्थापन व नगर परिषदेच्या मराठी, उर्दू तसेच सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहचविण्यात आली आहेत. शाळांच्या पटसंख्येनुसार  इयत्तानिहाय, विषयनिहाय पाठ्यपुस्तकांची विभागणी करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी पाठ्यपुस्तके गोणपाटामध्ये भरून तालुक्यातील प्रत्येक शाळेतमध्ये पोहचविण्यात आली आहेत. १८ जुन रोजी कठोरा व मनसगांव केंद्राचा शेवटचा टप्पा शिक्षण विभागाद्वारे पुर्ण करण्यात आला आहे.गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम फुसे, ज्ञानेश्वर घुले, पांडुरंग सुर्यवंशी, विनोद वैतकार, श्रीकांत सोनोने आदी कर्मचाºयांनी पाठ्यपुस्तके प्रत्येक शाळेत पोहचविली आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणून सामाजिक न्याय दिवस व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वितरित करून पाठ्यपुस्तक दिन साजरा करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये नविन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्त महाराष्ट्र घटविण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी ‘तंबाखूमुक्त जीवन’ संकल्प विद्यार्थी करणार आहेत. माझी शाळा, माझे कार्यालय, माझे गाव, माझे कुटुंब, माझे घर आणि माझा परिवार तंबाखू मुक्त करण्यासाठी विद्यार्थी शपथ घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी वर्षभर प्रयत्नशील राहणार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाStudentविद्यार्थी