वाहनांवर दगडफेक, लुटमारीचा प्रयत्न
By Admin | Updated: September 25, 2014 01:15 IST2014-09-25T01:03:14+5:302014-09-25T01:15:30+5:30
भालेगाव फाट्याजवळ तीन वाहनांवर दगडफेक करून लुटमारीचा प्रयत्न.

वाहनांवर दगडफेक, लुटमारीचा प्रयत्न
जानेफळ (बुलडाणा) : भालेगाव फाट्यावर काल रात्री दरम्यान तीन वाहनांवर दगडफेक करीत लुटमारीचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने जानेफळ परिसरात खळबळ उडाली असून, रात्री-बेरात्री प्रवास करणार्या वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भालेगाव ता.मेहकर फाट्यावरील पुलानजीक वाहने अडविण्याचा प्रयत्न करीत अज्ञात चोरट्यांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यात गोमेधर येथील श्रीराम काशिनाथ काळे (२४) हा तरुण कपाळावर दगड लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डाव्या डोळ्याच्यावरील बाजुस मोठी जखम झाल्याने उपचारार्थ त्याला मेहकर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तो आपले काका संतोष काळे यांना घेऊन उपचारासाठी मेहकर येथे येत होता; तसेच त्याच्या पाठीमागून येत असलेल्या सचिन दिवटे यांची अल्टो कार व डोणगाव येथील इंडिगो कारवरसुद्धा दगडफेक झाल्याने त्यांच्या वाहनांचे काच फुटून नुकसान झाले आहे.