आगीत किराणा दुकान व घरातील साहित्य खाक
By Admin | Updated: October 29, 2014 00:14 IST2014-10-29T00:14:33+5:302014-10-29T00:14:33+5:30
भालेगाव बाजार येथील घटना.

आगीत किराणा दुकान व घरातील साहित्य खाक
भालेगाव (बुलडाणा) : शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून घर तसेच दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज २८ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथे घडली. यामध्ये सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गावातील मध्यभागी असलेल्या राजेश अंबालाल कोठारी यांच्या दुकानात आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. क्षणार्धातच या आगीने रौद्ररुप धारण केले. यामुळे आगग्रस्तांसोबतच शेजार्यांची तारांबळ उडाली व एकच कल्लोळ झाला. गावकर्यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत किराणा दुकानातील तसेच घरातील साहित्य जळून खाक झाले होते. घरामध्ये असलेला कापूसही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. लागलेली आग शेजारी जगदिशचंद्र झांबड व संजय झांबड यांचे घरापर्यंत पोहोचत होती; मात्र ग्रामस्थांनी आग विझविल्याने पसरण्यापासून वाचली.