झेरॉक्स दुकानाला आग; ४.५0 लाखांचे नुकसान
By Admin | Updated: January 21, 2017 02:34 IST2017-01-21T02:34:05+5:302017-01-21T02:34:05+5:30
संग्रामपूर येथील घटना.

झेरॉक्स दुकानाला आग; ४.५0 लाखांचे नुकसान
संग्रामपूर, दि. २0- शहरातील पंचायत समितीजवळ असलेल्या हुमेरा झेरॉक्स सेंटरला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने, या झेरॉक्स दुकानमधील कॉम्प्युटर व इतर साहित्य खाक होऊन साडेचार लाखांचे नुकसान झाले. ही घटना २0 जानेवारीच्या मध्यरात्रीदरम्यान घडली.
शहरातील पंचायत समितीजवळ युसूफ शेख यांचे हुमेरा या नावाने झेरॉक्सचे दुकान आहे. २0 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने या दुकानचे कुलूप तोडून दुकानातील साहित्याला आग लावली. या आगीमध्ये झेरॉक्स मशीन, स्कॅनर, दोन कॉम्प्युटर, लॅपटॉप, कॅमेरा, दोन प्रिंटर, इन्र्व्हटर बॅटरी, जनरेटर, असे सर्व साहित्य व दुकानातील महत्त्वाची कागदपत्रे या आगीत जळून भस्मसात झाली.
या घटनेत सुमारे ४ लाख ५0 रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी रात्री घटनास्थळाला भेट देऊन सकाळी पंचनामा केला.
याप्रकरणी युसूफ शेख यांनी तामगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. संग्रामपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.