शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरात दोन जिनिंग, बायोटेक कंपनीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 11:09 IST

लक्ष्मी नगरातील अ‍ॅग्रो बायोटेक कंपनी व जाधववाडीतील दोन जिनींग फॅक्ट्रीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: येथील लक्ष्मी नगरातील अ‍ॅग्रो बायोटेक कंपनी व जाधववाडीतील दोन जिनींग फॅक्ट्रीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजता घडली. त्यात अंदाजे दीड कोटींचे नुकसान झाले.लक्ष्मी नगरातील चैतन्य अँग्रो बायोटेक प्रा.लि. या कंपनीला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खाजगी पाणी वाहतूक करणारे चालक मालक पंकज राजेंद्र खराडे त्यांचे टँकर नजिकच्या मार्गावरून जात असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला असता त्यांनी तात्काळ टँकरने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, राजेंद्र वाडेकर, पालिकेचे अग्निशमन दल घेवून घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी कंपनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तत्पूर्वी कंपनीचे संचालक अशोकराव देशपांडे व प्रसंन्ना देशपांडे घटनास्थळी दाखल झाले होते. कंपनीचे पश्चिमेकडील स्क्रँप पूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवानं आग पुढे सरकण्यापूर्वी आटोक्यात आल्याने लाखोच नुकसान झाले मात्र मोठा अनर्थ टळला. नांदुरा रस्त्यावर जाधववाडीतील डबल डायमंड फँक्टरीत घडली. त्या ठिकाणी जिनमाता जिनिंग कंपनीच्या सुमारे ४०० गठाणी तर निखिल ट्रेडींग कंपनीच्या सुमारे ३०० गठाणी आगीत जळून खाक झाल्या. या आगीविषयी माहिती देताना उपस्थितांनी सांगितले की ,गठाणीवर लावलेला खतांच्या पिशव्यांंचा पडम सुसाट हवेमुळे इलेक्ट्रीक डि.पी.वर पडल्याने पेटला.त्यामुळे कापसाच्या गठाणींनी पेट घेतला आणि त्याच रूपांतर मोठ्या आगीत झाल्याने अंदाजे सव्वा कोटीच्या कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Malkapurमलकापूरfireआग